vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

जागतिक कर्करोग दिनी आयोजित विशेष कर्करोग तपासणी मोहीमेचा 267 नवी मुंबईकरांनी घेतला लाभ…

जागतिक कर्करोग दिनी आयोजित विशेष कर्करोग तपासणी मोहीमेचा 267 नवी मुंबईकरांनी घेतला लाभ…

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने 4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरातील नागरिकांकरिता कर्करोग तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत नवी मुंबई शहरात यापूर्वी माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ तसेच 13 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा एकूण 14 ठिकाणी स्थापित केलेल्या कर्करोग तपासणी केंद्रात (Cancer Screening Center) कर्करोग तपासणी करण्यात आल्या. कर्करोगाचे लवकर निदान होणेच्या अनुषंगाने आज 128 पुरुष व 139 स्त्रिया अशा एकूण 267 नागरिकांची तपासणी करण्यात आली. कर्करोगाचे लवकर निदान होण्याकरिता त्यांच्या कर्करोग तपासण्या करण्यात आल्या.

 नवी मुंबई महानगरपालिकेने दि.11 ऑक्टोबर 2024 पासून नवी मुंबई शहरातील नागरिकांचे कर्करोग निदान लवकर होउून कर्करोगग्रस्त नागरिकांवर जलद उपचार होण्याकरिता नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय आणि 13 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा एकूण 14 ठिकाणी कर्करोग तपासणी केंद्र (Cancer Screening Center) सुरु करण्यात आलेली आहेत. जानेवारी अखेरपर्यंत या केंद्रांमध्ये 6764 पुरुष व 9075 स्त्रिया अशाप्रकारे एकूण 17839 इतक्या नागरिकांनी लवकर निदान होण्याच्या दृष्टीने कर्करोग तपासणी करुन घेतलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना कर्करोग संबंधित उपचारासाठी खाजगी किंवा टाटा हॉस्पिटल, परळ मुंबई आणि खारघर येथे लांब जायला लागू नये व त्यांच्यावर नवी मुंबई शहरातच उपचार व्हावेत यासाठी दि.17 जानेवारी 2025 पासून माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे टाटा ॲक्ट्रेक (TATA ACTREC) यांच्या सहयोगातून कँसरग्रस्त रुग्णांकरिता 10 खाटांचे डे केअर केमोथेरपी सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. त्याठिकाणी आतापर्यंत 8 रूग्णांनी उपचाराचा लाभ घेतला असून आज एका रुग्णाने डे केअर केमोथेरपी उपचार घेतला आहे.  4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई शहरातील नागरिकांना त्यांचे आरोग्य निरामय व निरोगी रहावे या दृष्टीने कर्करोगविषयी कोणतीही शक्यता जाणवल्यास नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या कर्करोग तपासणी केंद्रात जाउुन कर्करोग तपासणी करून घेण्यासाठी जाहीर आवाहन केले आहे

.00000000000

संबंधित पोस्ट

इराण आणि अमेरिका इस्त्रायल युद्ध – कुवेत एअरवेजचे विमान केरळमध्ये 20 भारतीयांचे मृतदेह घेऊन दाखल…

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज घेण्यासाठी मोहीम सुरु

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दात्यांना जुलै 2025 साठीचा जीएसटीआर -3 बी दाखल करण्याच्या अंतिम कालमर्यादेला मुदतवाढ

मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत कार्यान्वित प्रकल्पामुळे रोजगार संधीत वाढ, समुदाय कल्याण पूरक उपक्रमात स्थानिकांचा सक्रिय सहभाग..

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडून जिल्हा परिषद शाळांची तपासणी; मूलभूत सुविधा व सुरक्षा उपायांची पाहणी

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार पाळण्याबाबतच्या शासनाने जारी केल्या सूचना…