vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

खेळाचे मैदाने, उद्याने,आरक्षित असलेल्या  म्हाडाचे ८० भूखंड जाणार मुंबई महापालिकेच्या ताब्यात, देणात येणार आहे.

खेळाचे मैदाने,उद्याने आदि,आरक्षित असलेल्या  म्हाडाचे ८० भूखंड जाणार मुंबई महापालिकेच्या ताब्यात, देणात येणार आहे.

मुंबई प्रतिनिधी  : खेळाची मैदाने, उद्याने यांच्यासाठी आरक्षित असलेले सुमारे 80 सुविधा भूखंड म्हाडा  देखभालीसाठी महापालिकेच्या  ताब्यात देणार आहे. यासाठीच्या जोरदार हालचाली म्हाडा मुख्यालयात सुरु असून हे भूखंड लवकरच पालिकेला देण्याची तयारी म्हाडाने केली आहे. यामुळे आरक्षित भूखंडावर विविध विकास कामांसाठी निधी खर्च करण्यावरून नगरसेवक आणि आमदारांमध्ये होणाऱ्या वादांवर पडदा पडणार आहे. राज्य सरकारने म्हाडाला स्वतंत्र नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतींमध्ये महापालिकेतर्फे मलनिःसारण, वाहिन्या, जयवाहिन्या जोडणी, रस्त्यांची दुरुस्ती इत्यादीसारख्या मूलभूत सुविधा देण्यास नकार दिला होता. नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता म्हाडा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतींमध्ये मलनिःसारण वाहिन्या, जलवाहिन्या, रस्ते दुरुस्ती आदी मूलभूत सुविधा महापालिकेमार्फतच पुरविल्या जातील, असा निर्णय घेतला

तसेच महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार म्हाडा वसाहतीमधील आरक्षित भूखंड असलेले खेळाची मैदाने, उद्याने आदी भूखंड महापालिकेकडे सोपविणे आवश्यक आहे. त्यानुसार म्हाडाने आपल्या हद्दीतील भूखंड महापालिकेच्या ताब्यात तात्पुरत्या स्वरूपात देण्याचे निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाने शहर आणि उपनगरातील सुमारे 80 भूखंडांची यादी तयार केली आहे. तसेच इतर भूखंडांचीही माहिती जमा करण्याचे काम सुरु असून यासाठी सतत बैठकांचा जोर वाढला आहे. तात्पुरत्या स्वरूपात हे भूखंड म्हाडा महापालिकेच्या ताब्यात देणार आहे. म्हाडाकडे असलेल्या या भूखंडांवर नगरसेवक आणि आमदार निधीतून कामे करण्यासाठी चढाओढ लागत होती. मात्र आता हे भूखंड महापालिकेच्या ताब्यात जाताच लोकप्रतिनिधींमध्ये होणारे वाद शमणार आहेत.

संबंधित पोस्ट

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर  काय म्हणाला, मीही मेलो असतो तर..; भारतीय हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहरची प्रतिक्रिया..

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

vishwatmaklokswamivarta

उदयपूर येथील कन्हैया लालच्या हत्येतील चार आरोपींना न्यायालयाबाहेर जमावाकडून मारहाण

प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवा  – न्या. ईश्वर सूर्यवंशी.जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालयांमध्ये २८ सप्टेंबर, २०२४ रोजी होणार राष्ट्रीय लोकअदालत

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारला सर्वोच्च दणका; पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सुप्रिम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने होणार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती

राज्यस्तरीय आरएसपी शिक्षक अधिकारी प्रशिक्षणास सांगली येथे प्रारंभ,विद्यार्थी, नागरिकांमध्ये ट्रॅफिक सेन्स वाढविण्यास प्रयत्न व्हावेत- अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर