vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेआणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट       

भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेआणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर, सातारा परिसर येथील भगवान बाबा बालिका आश्रमास भेट देऊन येथील मुलींना मिळणाऱ्या सेवा सुविधांची पाहणी केली.

त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार,महिला बालविकास अधिकारी गणेश पुंगळे तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय आणि विभागीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी,भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यावेळी उपस्थित होत्या.

 यावेळी त्यांनी मुलींशी संवाद साधत बालगृहातील अडचणी जाणून घेतल्या. बालगृहातील मुलींनी आपल्या कलागुणातून साकार केलेल्या पेंटिंग्स आणि फ्रेम याविषयी माहिती दिली. मंत्री अदिती तटकरे तसेच नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. मुलीशी संवाद साधून कौतुकाची थाप दिली. यावेळी श्रीमती तटकरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांशी तसेच पत्रकारांशी संवाद साधला.

०००००

संबंधित पोस्ट

वाचन प्रेरणा दिवस,वाचक हेच वाचन संस्कृतीचे रक्षक- डॉ. मिलिंद दुसाने

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताकदिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा-2024-25

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार· ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता…

vishwatmaklokswamivarta

शासन निर्णयाची प्रशासकीय अधिकार्‍यांकडून पायमल्ली- अ‍ॅड. मगरेप्रशासनाने दलीत आदिवासी गायरान कास्तपट्टे सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआंदोलन -अ‍ॅड.भास्कर मगरे यांचा प्रशासनाला इशारा

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा