vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर

गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे येत्या एक महिन्यात जिल्हानिहाय पर्यवेक्षकीय समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फत प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमित कार्यशाळा घ्याव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पीसीपीएनडीटी बाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीला विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत नागरी नोंदणी कार्यप्रणालीच्या अहवालानुसार लिंग गुणोत्तर प्रमाणाचा जिल्हानिहाय आढावाही घेण्यात आला.

संबंधित पोस्ट

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनाऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत 

vishwatmaklokswamivarta

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते कातकरी समाजातील लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी व घरकुल बांधणीचा पहिला हप्ता वितरित* 

vishwatmaklokswamivarta

📰 ‘शिवाजी कोण होता’ या शिवरायांचा अपमान करणाऱ्या पुस्तकावर बंदीची मागणी; संभाव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांना निवेदन 🚩

माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी…

vishwatmaklokswamivarta

बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण

रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.-  सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार