vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

मुंबई, प्रतिनिधी : लोकांच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेखाली राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ २३ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचण्यात आला. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे सचिव, डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालक, डॉ. कादंबरी बलकवडे, तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते
दिनानिमित्त पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि राष्ट्रीय आयुष अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद वनस्पती माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्या वनस्पतीची माहिती मोबाइलवर उपलब्ध होत होती.
राज्यातील सर्व आरोग्य आणि आयुष संस्था, एकात्मिक आयुष रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिरे (आयुष) आणि आयुर्वेद दवाखान्यांमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. आयुर्वेद व्याख्यान, निबंध आणि चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण, आणि ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अंतर्गत आयुष शिबिरे व योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

000

संबंधित पोस्ट

श्री गुरु तेग बहादुरजींचे सर्वोच्च बलिदान मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा दीपस्तंभ – राज्यपाल जिष्णु देव वर्मा नवी मुंबईत ‘श्री गुरु तेग बहादुरजी यांचा वारसा’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

मुंबईत दसरा आणि नवरात्र उत्सवासाठी ३०,००० पोलिस कर्मचारी तैनात

कॅनडातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी विकासातील भागीदारीच्या नव्या उंची गाठतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा

vishwatmaklokswamivarta

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक,रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करा…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील ओव्हल, आझादसह क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी,सर्वसमावेशक नवीन धोरण तयार करावे , राज्यातील खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा;मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहांसह चेंजिंग रूम उभारा- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

जनसुरक्षा विधेयकाने देशविघातक संघटनाच्या मुसक्या आवळणार – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री