vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जुलै-ऑगस्ट मधील १९.२२ आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी१ हजार ३३९ कोटींच्या मदतीस मान्यता- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

जुलै-ऑगस्ट मधील १९.२२ आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी१ हजार ३३९ कोटींच्या मदतीस मान्यता- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, प्रतिनिधी:- राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करून त्याचे जीवन सुकर करण्यासाठी ही मदत निश्चितच उपयोगी पडेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

अमरावती विभाग-अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील ७ लाख ८८ हजार ९७४ शेतकऱ्यांच्या ६ लाख ५४ हजार ५९५.४२ हेक्टर वरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी ५६५ कोटी ६० लाख ३० हजाराच्या मदतीस मान्यता.

नागपूर विभाग,नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील ३७ हजार ६३१ शेतकऱ्यांच्या २१ हजार २२४.६४ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी २३ कोटी ८५ लाख २६ हजाराच्या मदतीस मान्यता.

पुणे विभाग,पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या ८ हजार ८३५.१५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १४ कोटी २८ लाख ५२ हजाराच्या मदतीस मान्यता.

छत्रपती संभाजीनगर ,छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील १० लाख ३५ हजार ६८ शेतकऱ्यांच्या ८ लाख ४८ हजार ४४५.३७ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजाराच्या मदतीस मान्यता.

नाशिक विभाग,नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील २४ हजार ६७७ शेतकऱ्यांच्या १२ हजार १४९.४६ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १३ कोटी ७७ लाख ३१ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.

००००

 

संबंधित पोस्ट

राज्यातील ४ हजार ५३७ रुग्णालयांमध्ये २ हजार ३९९ मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना; सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार देण्यास कटिबद्ध – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

आजपासून महाकुंभची सुरुवात! पौष पौर्णिमेला शाही स्नानाने महाकुंभमेळ्याची सुरुवात, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर भाविकांचा अथांग सागर…

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून जीव घेणा हल्ला करणाऱ्या बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

vishwatmaklokswamivarta

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट* महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा समावेश* -रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त