vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

फसव्या भरती संदेशापासून सावधान; आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

फसव्या भरती संदेशापासून सावधान; आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: मेहकर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक व इतर पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे, अशा आशयाचे फसवे मेसेज व्हॉटॲप व सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहेत. बेरोजगार युवक-युवतींना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले असून अशा फसव्या संदेशावर विश्वास ठेवू नये व फसवणूकीला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय बलकार(मेहकर) यांनी केले आहे.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत कोणतीही भरती प्रक्रिया सध्या सुरू नाही. तसेच अशा प्रकारची अधिकृत जाहिरातही जारी केलेली नाही. त्यामुळे अशा फसव्या संदेशाला बळी पडू नका. आरोग्य विभागातील किंवा इतर सरकारी भरतीच्या जाहिराती फक्त अधिकृत संकेतस्थळावर किंवा वर्तमानपत्रांतच प्रसिद्ध केल्या जातात. संशयास्पद संदेश आढळल्यास तात्काळ संबंधित प्रशासनास कळवावे. बेरोजगार उमेदवारांची फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची विशेष सुविधा

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘अमृतकाळ विकसित भारत-२०४७ परिषदे’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

वन जमिनींच्या वाटपाबाबतची याद्या प्रसिद्ध, हरकतींसाठी १० दिवसांची मुदत…

आज दि.18 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवन येथे “स्वामित्व”योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत सुरक्षित तटम् समृद्ध भारत ; सीआयएसएफ वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर बालगृहे, अनाथाश्रम, वसतिगृहे आढळुन आल्यास शासनास कळविण्याचे आवाहन