vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी–जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त व अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी ‘हात मदतीचा’ हा उपक्रम दि.११ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले आहेत.यासंदर्भात आदेशही निर्गमित केले आहेत.

 आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकरी यांना मदत व्हावी यासाठी हे अभियान दि.१० ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येईल. बाधीत कुटुंब ज्या योजनेंतर्गत मदतीसाठी पात्र ठरतील त्यांतर्गत मदत देण्यात येईल. तसेच जे पात्र ठरत नाहीत अशा कुटुंबांना स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या माध्यमातून मदत देण्यात येईल.

 त्यासाठी दि.११ रोजी स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, संघटना यांच्यासमवेत बैठक घेऊन मदतीचे नियोजन करण्यात येईल. दि.१४ व १५ ऑक्टोंबर रोजी तालुकास्तरावर कार्यक्रम घेऊन मदत धनादेश, मंजूरी आदेश इ. चे वाटप करण्यात येईल. दि.११ रोजी पात्र कुटुंबाकडुन अर्ज भरुन घेणे, कागद पत्रे भरुन घेतील. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी ही पूर्तता करतील. दि.१३ ऑक्टोंबर रोजी अपूर्ण कामे पूर्ण करणे व मंजूरी देणे, धनादेश, मंजूरी आदेश तयार करणे, दि.१४ व १५ ऑक्टोंबर रोजी तहसिल कार्यालयात मदत वाटप कार्यक्रम आयोजीत करुन मदत वाटप करण्यात येईल. मदत वाटपाचे कार्यक्रम साध्या स्वरुपात असावे,अशी सुचनाही देण्यात आली आहे.

 याप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला असून शेतकरी आत्महत्याग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कुटुंबांना ऐन सणाच्या आधी हा मदतीचा हात दिला जाणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांकरीता लक्षांक प्राप्त

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देशभरातील 83 शहरांमधील 2,072 केंद्रांवर नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2026 चे आयोजन

विधानसभा लक्षवेधी सूचना पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना- कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

ग्राहकांनी सजग राहून सुरक्षित व्यवहाराची सवय अंगीकारावी – न्यायाधीश सय्यद सादिक अली तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता – मंत्री चंद्रकांत पाटील

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले पाऊल …प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta