vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर

जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर

सातारा प्रतिनिधी: महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता खाली दर्शविल्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे नाव, सभेचे ठिकाण व सभेची वेळ व तारीख याप्रमाणे विशेष सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली

 1) सातारा जिल्हा परिषद- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा स. ११.३० वा दि. १३/१०/२०२५

2) खंडाळा पंचायत समिती-तहसिल कार्यालय, खंडाळा स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५

3) फलटण पंचायत समिती-सजाई गार्डन मंगल कार्यालय, जाधववाडी (फ) स. ११.३० वा दि.१३/१०/२०२५

4) माण पंचायत समिती-तहसिल कार्यालय, दहिवडी सभागृह स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५

5) खटाव पंचायत समिती -पंचायत समिती सभागृह, खटाव स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५

6) कोरेगाव पंचायत समिती- तहसिल कार्यालय, कोरेगांव स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५

7) वाई पंचायत समिती- देशभक्त किसनवीर सभागृह, पंचायत समिती, वाई स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५

8) महाबळेश्वर पंचायत समिती -मध संचालनालय, महाबळेश्वर स. ११.३० वा दि.१३/१०/२०२

9) जावली पंचायत समिती- पंचायत समिती सभागृह, मेढा स. ११.३० वा दि.१३/१०/२०२५

10) सातारा पंचायत समिती- स्व. आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सभागृह, पंचायत समिती, सातारा स. ११.३० वा दि.१३/१०/२०२५

11) पाटण पंचायत समिती-लोकनेते बाळासाहेब देसाई, कृषी संकूल, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कराड-चिपळून रोड, काळोली स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५

12) कराड पंचायत समिती-स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल), कराड स. ११.३० वा दि.१३/१०/२०२५

    जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

0 0 0 0

संबंधित पोस्ट

सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंती निमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत…

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

एक दिवस सैनिकांसाठी’अभियान राबविणार    -जिल्हाधिकारी आशिष येरेकर-सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आऱ. पाटील यांना हस्तक्षेपाची विनंती

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात: एसडीआरएफ आणि एनडीआरए यंत्रणा सज्ज,नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन