vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्यास्थानिक बातम्या

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत उपराष्ट्रिय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम…

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत उपराष्ट्रिय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम…

     नवी मुंबई प्रतिनिधी  – नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये ० ते ५ वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण करण्यात येणार असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.

          भारत देश पोलिओमुक्त आहे. परंतू काही देशांमध्ये अद्याप पोलिओ असल्याtने तो पुन्हा परत येऊ शकतो यासाठी पल्स पोलिओ मोहीम राबविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्ष वयोगटामधल्या अपेक्षित ८८७४८ बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेऊन मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६१८ स्थायी, ७६ ट्रांझिट व २७ फिरते मोबाईल असे एकूण ७२१ बुथ कार्यरत असणार आहेत. या लसीकरण मोहिमेसाठी मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी ट्रांझिट व फिरती मोबाईल पथके तयार करण्यात आलेली आहेत.

          त्याचप्रमाणे महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या अध्यक्षेतखाली सिटी टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली असून नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तसेच पल्स पोलीओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, आशा व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या मोहीमेकरीता महापालिका कार्यक्षेत्रात जनजागृतीपर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले आहेत.

          या पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत ज्या बालकांनी दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी डोस घेतला नसेल त्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ९०२ टिमव्दारे गृहभेटीमध्ये पुढील ५ दिवस‍ घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक टिमचे कार्यक्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

          तरी पालकांनी पोलिओवर मात करण्यासाठी देशव्यापी मोहिमेत सहभागी व्हावे आणि आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारØ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

केंद्र आणि राज्याच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ; शेतकऱ्यापर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार गौरव पुरस्कार सोहळा-विद्याधर अनास्कर यांना ‘सहकार महर्षी’, आमदार विनय कोरे यांना ,’सहकार भूषण पुरस्कार,

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका चषक पर्यावरणपूरक व प्लास्टीकमुक्त सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2025-26 चे आयोजन

राज्यात 99.26 टक्के ऊस उत्पादकांना एफआरपी अदा;उर्वरित 298 कोटी व्याजासह वसूल करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध, प्रगतिशील होवो; उपमुख्यमंत्र्यांचे विघ्नहर्ता गणरायाचरणी साकडे