vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती संभाजीनगर येथे कुणबी प्रमाणपत्र संदर्भातील महत्त्वपूर्ण जिल्हानिहाय आढावा बैठक संपन्न…

छत्रपती संभाजीनगर येथे कुणबी प्रमाणपत्र संदर्भातील महत्त्वपूर्ण जिल्हानिहाय आढावा बैठक संपन्न…

 

राज्य प्रतिनिधी 📍विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ,छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात कुणबी प्रमाणपत्र संदर्भात महत्त्वपूर्ण जिल्हानिहाय आढावा बैठक घेतली. या बैठकीस आ. प्रसाद लाड, विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत तसेच जिल्हाधिकारी उपस्थित होते.

हैद्राबाद गॅझेट लागू झाल्यानंतर वंशावळ नोंदींची सखोल पडताळणी करून कुणबी प्रमाणपत्र वितरणाचे काम अनेक जिल्ह्यांत चांगल्या पद्धतीने झाले आहे.

काही ठिकाणी निदर्शनास आलेल्या त्रुटी लक्षात घेता गावपातळीवर गठीत समित्यांमार्फत अधिक सक्षम आणि काटेकोर कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय नियमित आढावा घेऊन पात्र नागरिकांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, दिरंगाई किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. नागरिकांच्या हक्कांशी संबंधित या विषयात प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने कार्य करावे, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले.पात्र नागरिकांना न्याय, पारदर्शकता आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून प्रशासन यंत्रणा अधिक परिणामकारकपणे कार्यरत राहील, हा विश्वास यावेळी व्यक्त केला.

0000

संबंधित पोस्ट

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!… हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेतली

आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर प्रवेशाकरीता-ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन “देशाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने एक व्यापक राष्ट्रीय मिशन” असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन

छावणीमध्ये दाखल जनावरांना चारा, पाणी, पशुखाद्य-देण्यासाठी 30 जून पर्यंत दरपत्रक मागणी