vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना गती द्या – जिल्हाधिकारी संतोष पाटील

सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना गती द्या – जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

सातारा प्रतिनिधी: सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना निधी उपलब्ध असूनही गेल्या दोन वर्षांपासून कामे रखडलेली आहेत. पर्यटनवाढीच्या दृष्टीने ही कामे शासनाने हाती घेतली आहेत, तरी या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आढावा घेतला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कुसवडे कारवट, कोयना रासाटी, पानेरी, निवळी, मेंढेघर येथील पर्यटन आराखड्यातील कामे व हेळवाक, येराड जलपर्यटन केंद्रांच्या कामाचा आढावा घेतला. या सर्व कामांना निधी उपलब्ध आहे, ठेकेदाराला सांगून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्ते कामे पूर्ण करावी व पावसाळ्यात जी कामे करता येतील त्या कामाचे साहित्य आत्तापासून संबंधित ठिकाणी टाकावे. या कामांचे मंजुरीचे प्रस्ताव ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, अशा प्रस्तावांची यादी द्यावी संबंधित विभागाशी चर्चा करुन प्रस्तावांना तातडीने मंजुरी मिळवून देण्याचे कामही केले जाईल.

बामणोली येथील गोदाम नुतनीकरणाचे काम सुरु आहे. तेथील काही नागरिक या कामात अडथळा आणत आहेत, हे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी व तातडीने पूर्ण होण्यासाठी जे कामात अडथळा आणतील त्यांच्यावर पोलीस विभागामार्फत कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.

0000

संबंधित पोस्ट

स्टेप’ उपक्रमातील शॉर्ट टर्म कोर्सेससाठी नियमित आयटीआय अभ्यासक्रमाचा निधी वापरलेला नाही– कैशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची दि.३० एप्रिल पर्यंत संधी उपलब्ध 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

इग्नाईट-२०२६’मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज !१० लाख भाविकांची मांदियाळी – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

तरुणांमध्ये नेतृत्त्वक्षमता विकसित करण्यासाठी विद्यापीठे, उद्योगसंस्थांमध्ये भागीदारीची गरज – राज्यपाल जिष्णू देव वर्मा