vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवात मौन श्रद्धांजली अर्पण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवात मौन श्रद्धांजली अर्पण

अमरावती, प्रतिनिधी-

गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज उपस्थित होते. यावेळी गुरुकुंज मोझरी आश्रम परिसरात मान्यवरांसह भव्य जनसमुदयामार्फत स्वयंसंचलित मौन बाळगून शांततेत अत्यंत श्रद्धेय भावनेने मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सामुदायिक प्रार्थना, ध्यान तसेच आरती केली.

खासदार डॉ अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार राजेश वानखडे, गजानन लेवटे, प्रताप अडसड, नवनीत राणा, प्रवीण पोटे-पाटील, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जनार्दन बोथे गुरुजी, पुष्पाताई बोंडे, दिनेश सूर्यवंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मौन श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम स्थळी तबला, पेटी शंखनाद या पारंपारिक वाद्यांसह सर्वधर्मीयांच्या प्रार्थना सामूहिक रित्या म्हणण्यात आल्या. डॉ. तिवारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जीवनपट यावेळी कथन केला.

मौन श्रद्धांजली कार्यक्रमासाठी देशभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून देश-विदेशातील नागरिकही उपस्थित होते. पुण्यतिथी कार्यक्रम निमित्त येथे मोठी यात्रा भरलेली असून गावागावातून दिंड्या कार्यक्रम स्थळी आल्या होत्या.

0000

संबंधित पोस्ट

गोरगरीबांना स्वस्तात घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

देशाच्या स्वातंत्र्यदिना बरोबर निरंकारी मिशनने साजरे केलेआत्मिक जागृतीचे पावन पर्व : मुक्ती पर्व भक्तीमध्ये स्वातंत्र्याची मुक्ती- निरंकारी राजपिता रमितजी

जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा  – पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

8 एप्रिल रोजी दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन ; कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

टंचाई असलेल्या ठिकाणचे टँकर प्रस्ताव तातडीने पाठवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया