vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार-2025कोकण व मुंबई प्राधिकरण विभागांनी पटकाविले सर्वाधिक 33 पुरस्कार

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार-2025कोकण व मुंबई प्राधिकरण विभागांनी पटकाविले सर्वाधिक 33 पुरस्कार

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या निर्यातदार उद्योजकांना महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार- 2025 वितरण सोहळा राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांचे हस्ते हॉटेल ताज लँड्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई येथे संपन्न झाला.

कोकण विभागातून एकूण 21 उद्योजकांना यावर्षी सुवर्ण व रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यापैकी ठाणे-14, पालघर-03, रायगड-02 व रत्नागिरी-02 या जिल्ह्यातून निर्यातदार उद्योजकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच मुंबई प्राधिकरण विभागातून एकूण 12 उद्योजकांना राज्य निर्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातून हिमल लि. (सुवर्ण), अपार इं.लि. (सुवर्ण), सिमॉसीस इंटरनॅशनल (सुवर्ण), झेनीथ इंडस्ट्रीयल रबर प्रो. (सुवर्ण), ज्योती स्टील इंडिया (सुवर्ण), जी एस एक्स्पोर्ट्स (सुवर्ण), जॅब्झ इंटरनॅशल प्रा.लि. (सुवर्ण), नवकार फॅब (सुवर्ण), तर, कनेक्ट वेल इंडस्ट्रीज, एच डी फायर प्रो., दुधिया सिंथेटिक्स, फुई गो टेक्स, व दलाल प्लास्टिक्स यांना रजत पुरस्कार तसेच रायगड जिल्ह्यातून असावा इन्‍शुलेशन प्रा.लि. यांना सुवर्ण तर श्रीकेम लॅब यांना रजत पुरस्कार आणि पालघर जिल्ह्यातून डि डेकोट एक्स्पोट्स, यांना सुवर्ण तर अमीटी लेदर इंटरनॅशनल यांना रजत पुरस्कार तसेच रत्नागिरी जिल्हयातून सुप्रिया लाईफ सायन्सेस व जिलानी मरीन प्रोडक्ट्स यांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

याशिवाय मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातून ॲटलस एक्सपोर्ट (सुवर्ण), बीडीएच इंडस्ट्रिज (सुवर्ण), इलेक्ट्रोफोकस इलेक्ट्रिकल्स (सुवर्ण), ग्लोब कोट्यम (सुवर्ण), लाहोटी ओव्हरसीज लि. (सुवर्ण), इंटरनॅशनल फूटस्टेप्स (रजत), क्रिश्ना अँटीऑक्सीडंट प्रा.लि. (रजत), सिनर्जी लाईफस्टाईल प्रा.लि. (रजत), ले मेरिट लि. (प्रमाणपत्र) पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

राज्यस्तरीय एकूण 67 निर्यात पुरस्कारामध्ये कोकण विभाग व मुंबई प्राधिकरण विभागाला 45 निर्यात पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. याप्रसंगी सन 2022 – 23 आणि 2023- 24 या वर्षांकरिता “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार 2025” चे वितरण मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले.

या पुरस्कार वितरण समारंभात उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, उद्योग सचिव डॉ. पी अन्बलगन, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम.देवेंदर सिंह, अतिरिक्त विकास आयुक्त वैभव वाघमारे तसेच कोकण/मुंप्रावि विभागाच्या उद्योग सहसंचालक श्रीमती विजू सिरसाठ आदी मान्यवर व कोकण/मुंप्रावि विभागातील सर्व महाव्यवस्थापक उपस्थित होते.

निर्यात कॉन्क्लेव्हचे आयोजन करुन एकाच प्लॅटफार्मवर DGFT, CUSTOM, EPC व इतर आवश्यक शासकीय कार्यालये उपलब्ध करुन निर्यातदारांना मार्गदर्शन व त्यांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यात आले, याशिवाय DEPC बैठकांचे नियमित आयोजन करण्यात आल्याचे हे फलित आहे. कोकण विभागातील तसेच मुंबई प्राधिकरण विभाग यातील सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी व कोकण- मुंप्रावि विभागाचे उद्योग सह संचालक श्रीमती विजू सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या यशासाठी या विभागातील सर्व जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक यांच्यासह उद्योग विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

बदलत्या काळानुरुप पोलीस खाते अद्ययावत, सुविधायुक्त असावे – ना. ॲड आकाश फुंडकर जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन..

vishwatmaklokswamivarta

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती;रत्नागिरीच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा– मंत्री नितेश राणे

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊ- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी आज मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीत दिला

पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय-पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आंबा- मिलेट महोत्सव २०२५ चे उद्घाटन शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा द्या- राज्यपाल हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta