vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या एन्काऊंटर दोन दहशतवाद्यांचा खात्मा…

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या एन्काऊंटर दोन दहशतवाद्यांचा खात्मा…

राज्य प्रतिनिधी

जम्मू काश्मीर कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या भागात आणखी दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने सुरक्षा दलांची संयुक्त शोध मोहीम सुरू आहे. संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून, लष्कर आणि पोलिस दलांनी संयुक्तरीत्या कारवाई तीव्र केली आहे.

भारतीय लष्कराला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. सुरक्षा दलांनी वारसन परिसरातील जंगल भागात शोधमोहीम हाती घेतली. या चकमकीदरम्यान दोन एके-श्रेणी रायफल्स, चार रॉकेट लाँचर्स, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि अन्य युद्धसाहित्य जप्त करण्यात आले आहे. परिसरातील काही भाग अद्याप तपासाअंतर्गत असून, दहशतवादी गटाचे इतर सदस्य पळून गेले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कुपवाडा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरी आणि दहशतवादी हालचालींमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षा दलांनी वेळोवेळी अनेक अशा कटांचा भांडाफोड केला असून, वारसन परिसरातील जंगलात दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

लातूर येथील पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा- पोलीस अधीक्षक अमोल तांबे· विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन· कृत्रिम बुद्धिमत्ता, वृत्त संकलन-संपादनाविषयी मार्गदर्शन

स्वायत्त महाविद्यालयांसाठी राज्यस्तरावर एकसमान मार्गदर्शक सूचना तयार करा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील १५ ऑगस्टपूर्वी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश

लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर

एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष ‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना; सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta