vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एक हात मदतीचा’, गुरुवार  पासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार मदत..

‘एक हात मदतीचा’, गुरुवार  पासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार मदत..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अभिनव संकल्पनेतून सामाजिक दायित्वाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील २६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या विविध उपक्रमांचा आणि योजनांचा लाभ देण्यात येत आहे. तसेच दिवाळीच्या निमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांसाठी विविध सामाजिक संस्थेच्या सहभागातून जिल्हा प्रशासनाने ‘एक हात मदतीचा’ द्वारे कुटुंबियांना मदतीचे किट देण्यात येणार आहे

हा उपक्रम राबविणासाठी कार्यक्रम याप्रमाणे-,गुरुवार दि. १६ रोजी दुपारी ३ वा.जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे, छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री या तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात येईल.गुरुवार दि.१६ रोजी दुपारी ३ वा. सिल्लोड येथे सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात येईल.शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी १० वा. कन्नड येथे कन्नड, खुलताबाद तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात येईल.शुक्रवार दि.१७ रोजी दुपारी ३ वा. लासूर स्टेशन येथे वैजापूर, गंगापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात येईल.

 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवाड्यानिमित्त तालुकास्तरावर केले. या सर्वेक्षणातून मदतीची गरज असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची निवड करण्यात आली. शासकीय योजनेच्या लाभाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करुन एक किट तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण २६७ कुटुंबियांना मदत केली जाणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये ३९,शेतकरी कुटुंब, फुलंब्रीमध्ये ३० पैठण तालुक्याचे ४० सिल्लोड येथील ६२ सोयगाव येथील १२ कन्नड येथील ३६ खुलताबाद येथील ४ शेतकरी आणि वैजापूर येथील १० गंगापूर येथील ३४ तसेच इतर उर्वरित सदस्य यांना मदत करण्यात येणार आहे

०००००

संबंधित पोस्ट

स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रकांत पाटील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध कामांचा कार्यारंभ

सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायबर फसवणूक तक्रारीसाठी ‘गोल्डन अवर’ महत्वाचा

vishwatmaklokswamivarta

अकोला जिल्‍ह्यातील अकोट,मुर्तिजापुर,तेल्‍हारा,हिवरखेड नगरपरिषद आणि बार्शिटाकळी नगरपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूकी करिता मतदान

vishwatmaklokswamivarta

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

vishwatmaklokswamivarta

विमानतळ परिसराचा १५ कि.मी.परीघ क्षेत्रात लेझर आणि बीम लाईट्सवर बंदी; पोलीस प्रशासनाचे आदेश