vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वस्तीशाळेवरील स्वयंसेवकांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन स्तरावर चर्चा करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

वस्तीशाळेवरील स्वयंसेवकांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन स्तरावर चर्चा करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, प्रतिनिधी: वस्ती शाळांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने शासनाने कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर वस्ती शाळा स्वयंसेवक / निमशिक्षकांची नियुक्ती केली. १ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार या स्वयंसेवकांना शासन सेवेत सामावून घेण्यात आले. त्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत शासन स्तरावर चर्चा करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

 

वस्ती शाळेवर शिकविणाऱ्या शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत आमदार अभिमन्यू पवार आणि राहुल कुल यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह वस्तीशाळेवरील शिक्षकांचे प्रतिनिधी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आबासाहेब कवळे, शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी, अवर सचिव विशाल परमार आदी यावेळी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, वस्ती शाळेवर शिकविणाऱ्या स्वयंसेवक/ निमशिक्षकांनी समाजाप्रती उत्कृष्ट योगदान दिले आहे. तथापि त्यांची मूळ नियुक्ती कंत्राटी स्वरुपाची होती. या शिक्षकांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील, या अटीवर २०१४ मध्ये शासन सेवेत सामावून घेण्यात आले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे धडे घ्यावे; १५ ऑगस्टनंतर मुदतवाढ नाही — मंत्री प्रताप सरनाईक

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

vishwatmaklokswamivarta

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज ठाणे स्टेशन येथे गिरणी कामगार संयुक्त लढा समिती वतीने ठाण्यात “स्मरण मोर्चा..

vishwatmaklokswamivarta

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी,करुन अहवाल द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे यंत्रणेस निर्देश…

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडकसागर हा तलाव आज सकाळी ६.२७ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन ओसंडून वाहू लागला