vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

महादेवा’ योजनेअंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणी;निवडलेल्या खेळाडूंना लिओनेल मेस्सीसमवेत खेळण्याची संधी..

महादेवा’ योजनेअंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणी;निवडलेल्या खेळाडूंना लिओनेल मेस्सीसमवेत खेळण्याची संधी..

बुलडाणा, प्रतिनिधी): राज्यातील युवा फुटबॉलपटूंना करिअर घडविण्याची आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी “महादेवा” ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत 13 वर्षांखालील मुले व मुलींसाठी फुटबॉल निवड चाचण्या आयोजित करण्यात आली आहे. या चाचण्यांमधून निवड होणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा एक भाग म्हणून राज्यभरातील 13 वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय फुटबॉल निवड चाचण्या आयोजित करण्यात येणार आहेत. या चाचण्यांमधून निवड होणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे.

या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा फुटबॉल निवड चाचणी दि. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीत 1 जानेवारी 2012 ते 31 डिसेंबर 2013 दरम्यान जन्मलेल्या मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात. सहभागी खेळाडूंनी चाचणीच्या दिवशी आधारकार्ड व जन्मप्रमाणपत्राची सत्यप्रत सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच गुगल नोंदणी लिंकद्वारे पूर्वनोंदणी पूर्ण केलेली असावी. संबंधित निवड चाचणीबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा किंवा जिल्हा फुटबॉल संघटना, बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळांनी आणि विद्यार्थी खेळाडूंनी या जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि. एस. महानकर यांनी केले आहे

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील 🚨 पोलादपूरात मुसळधार पाऊस !  सह्याद्री डोंगररांगांमध्ये रात्रभर १०५ मिमी पावसाची नोंद, एकूण पावसाची नोंद १५७१ मिमीवर! 🌊 सावित्री नदी उत्तर वाहिनीने पात्र ओसंडले. 🏠 शहरातील मंदिर, घाट, मार्केट पाण्याखाली….

विभागातर्फे खरीप हंगामाकरिता रासायनिक खत व भात बियाणांचे नियोजन..

जिल्हाभरात पोळा सणापासून ते दीपावलीपर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी मोहीम

प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील८८५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी,बैठकीत सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करीता अर्ज सादर करावेत

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!