vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास

देशभरात प्रवासाकरिता या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास..

राज्य प्रतिनिधी-प्रवासाची उत्तम सोय आणि आराम देणारा, FASTag चा वार्षिक पास या सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी एक परिपूर्ण भेट असू शकतो जो देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवर वर्षभर त्रासमुक्त प्रवास करण्यास सक्षम करतो. हा वार्षिक पास राजमार्गयात्रा ॲपद्वारे आपल्या प्रियजनांना भेट म्हणून दिला जाऊ शकतो.

ॲपवरील ‘पास द्या (ॲड पास)’ या पर्यायावर क्लिक करून, वापरकर्ता ज्या व्यक्तीला FASTag वार्षिक पास भेट देऊ इच्छितो; त्याचा वाहन क्रमांक आणि संपर्क तपशील जोडू शकतो. सोप्या OTP पडताळणीनंतर वार्षिक पास त्या वाहनाशी जोडलेल्या FASTag वर सक्रिय होईल. FASTag वार्षिक पास राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना एक अखंड आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय प्रदान करतो आणि तो संपूर्ण भारतातील सुमारे 1,150 टोल प्लाझांवर स्वीकारला जातो.

वार्षिक पासच्या एका वर्षाच्या वैधतेसाठी किंवा 200 टोल प्लाझा क्रॉसिंगसाठी 3000 रुपये शुल्क एकदाच भरल्यानंतर वारंवार FASTag पुनर्भरण (रिचार्ज) करण्याची आवश्यकता नाहीशी होते. हा पास वैध FASTag असलेल्या सर्व गैर-व्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे. राजमार्गयात्रा अ‍ॅपद्वारे एकदाच शुल्क भरल्यानंतर वाहनाशी जोडलेल्या विद्यमान FASTag वर वार्षिक पास दोन तासांच्या आत सक्रिय होतो.

.15 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासने पंचवीस लाख वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे आणि सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत आणि अखंड प्रवासाचा उत्तम अनुभव देतो, हे अधोरेखित होते.

संबंधित पोस्ट

शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा;संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश…

व्यायामशाळा विकास अनुदान मर्यादा ७ लाखांवरून १४ लाख रुपये- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*अनुकंपा आणि सरळसेवा पदभरतीच्या २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान*

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्ह्यातील ११ गावांचा समावेश; १५ जून पासून जनजागृती

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत विविध ठिकाणी देशी वृक्षरोपांची लागवड**पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सक्रीय पुढाकार घेण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी आरटीओ पुणे येथे अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

vishwatmaklokswamivarta