vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

मुंबई प्रतिनिधी -महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण अंधकारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. या निमित्त सर्वांना स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचे आवाहन करतो. पर्यावरण रक्षण, नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवन मूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा*

नौदल प्रमुखपदी कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

vishwatmaklokswamivarta

20 मे रोजीच्या औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज;औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना

🌧️ रायगड हवामान अपडेट | IMD ५ दिवसांचा अंदाज जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता….

नसरापुरच्या त्या नराधमाला भरचौकात फाशी द्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*