vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान भ्रष्टाचारविरोधी संदेश प्रसारित करण्याचे आवाहन

दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान भ्रष्टाचारविरोधी संदेश प्रसारित करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय दक्षता आयोगामार्फत २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह-२०२५ देशभर साजरा करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार हा विकासकामातील सर्वात मोठा अडथळा आहे. समाजाचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम केवळ आठवड्यापुरते न राबविता नियमित सुरु ठेवणे गरजेचे असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे.

कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास, त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई येथे संपर्क साधावा. किंवा संपर्क क्रमांक. 24921212, टोल फ्री क्रमांक 1064, व्हाट्सअप क्रमांक – 8828241064, तसेच

addicpacbmumbai@mahapolice.gov.in” या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.

नागरिक, सरकारी-खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी सक्रिय सहकार्य करावे असे अपर पोलीस आयुक्त (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संदीप दिवाण यांनी आवाहन केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

साई नगरी शिर्डी येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा काय म्हणाले ते पहा-

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारत मिशन व रोटरी क्लब हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दापूर परिसरातील तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी..

vishwatmaklokswamivarta

जी.डी.सी. अँड ए परीक्षेचे अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

गम का साया भी आप पर न आये, दुवा हैं हमारी आप सदा युहीं मुस्कुराये..!” – मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार