vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तकोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तकोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

नवी मुंबई, प्रतिनिधी -: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ” विभागीय महसूल कार्यालयाच्या बैठक सभागृहात सकाळी 11.00 वाजता तहसीलदार (सामान्य प्रशासन ) नरेश जगताप यांच्या उपस्थितीत अधिकारी/कर्मचारी यांनी घेतली.

दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशात “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी त्यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस भव्य स्वरुपात साजरा केला जाणार आहे. म्हणून दि. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत “भारत पर्व” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

“मी राष्ट्राचे एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन, सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व कार्यामुळे देशाची एकता राखणे शक्य झाले. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे.” अशी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी/कर्मचारी यांनी शपथ घेतली. यावेळी कोकण भवनातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000 0

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यदिनानिमित्त मेळघाट हाट येथे खादी महोत्सव

महिला व बालविका स मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन

धारावीत धारावी पुनर्वसन प्रकल्प अडाणी  तर मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विनायक विसपुते मुकादम उमेश वाघ ज्युनिअर इंजिनियर मस्के, कदम यांच्या आशीर्वादाने संपूर्ण धारावी मध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे चालू ..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील बांद्रा पूर्व येथे  भारतनगर झोपडपट्टी भागात सिलेंडर स्फोट झाल्याने एका चाळीचा भाग कोसळल्याची घटना..

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta