vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगरपरिषद निवडणुकीमुळे शेगाव येथील मंगळवारचा आठवडी बाजार रद्द…

नगरपरिषद निवडणुकीमुळे शेगाव येथील मंगळवारचा आठवडी बाजार रद्द…

बुलढाणा, प्रतिनिधी: शेगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या दिवशी अर्थात मंगळवारी शेगांवमध्ये भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. असे पत्रक जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे.

शेगांवमध्ये मंगळवारी आठवडी बाजार भरविण्यात येत असून या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होणाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यानुसार दि.2 डिसेंबर रोजीचा शेगांव शहर येथील मंगळवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत विविध स्तरातून विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे बुलढाणा बाजार आणि यात्रा कायदानुसार प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन शेगांव शहरामध्ये नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीकोणातून शेगांव शहरामध्ये मंगळवार 2 डिसेंबर या दिवशी भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द करण्यात येत आहे, असे पत्रकाद्वारे जिल्हादंडाधिकारी यांनी जाहीर केले आहे

संबंधित पोस्ट

दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा -सचिव तुकाराम मुंढे

महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅकर्स बस वाहतूक महासंघ तसेच ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने ट्रॅक, टेम्पो, टँकर, बस,ट्रेलर,प्रवासी कार, टॅक्सी यांच्या समस्याची सरकारने दखल न घेतल्यास उग्र आंदोलन छेडणार 

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक महिन्यात सोडवू बाधितांचे पुनर्वसन लवकरच करु-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

देशी गायींच्या पालनपोषण अनुदान योजनेसाठी,अर्ज करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

छायाचित्र प्रदर्शनातून उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारयांच्या जीवनप्रवासाचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस