vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कुष्ठरुग्ण शोध अभियानात 53 नवीन रुग्णांची नोंद

कुष्ठरुग्ण शोध अभियानात 53 नवीन रुग्णांची नोंद

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यात एलसीडीसी कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 53 नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाले असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.

कुष्ठरुग्ण शोध अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल 1 हजार 8 36 प्रशिक्षित तपासणी पथके कार्यरत असून ते घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करत आहेत. दि. 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत 17 लाख 3 हजार 408 नागरिकांची शारीरिक तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 10 हजार 737 संशयित चट्टयांचे रुग्ण आढळले असून त्यापैकी 7 हजार 866 जणांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी पूर्ण झाली आहे. नवीन रुग्णांना 6 महिने ते एक वर्षापर्यंत उपचारांचा कालावधी राहणार असून योग्य उपचार घेतल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो, असे सहाय्यक संचालक (कुष्ठ), डॉ. हरी पवार यांनी सांगितले.

ही मोहीम दि. 2 डिसेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार असून आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा तसेच पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत घरोघरी भेट देऊन तपासणी केली जात आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला पूर्ण सहकार्य करावे व स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

मासोदमध्ये आरोग्य स्थिती नियंत्रणात

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सार्वजनिक #आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (#एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

vishwatmaklokswamivarta

चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही’- डॉ. सुधा कांकरिया लिंगगुणोत्तर कमी असलेल्या १६ गावांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न.

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ – यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना लोकांच्या दीर्घायुष्‍य आणि निरामयतेप्रति समग्र दृष्टीकोन अधोरेखित करते“योग आपल्याला सन्मानपूर्वक जगण्‍यासाठी वृद्धापकाळात निरोगी राहण्‍याची कला शिकवतो”: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर – २४३ जणांची तपासणी