गडचिरोली, प्रतिनिधी-जिल्हा परिषद गडचिरोली येथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची संकल्पना साकार झाली असून, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.
या शिबिरात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पुढील तपासण्या करण्यात आल्या:
सामान्य शारीरिक तपासणी,रक्तदाब तपासणी मधुमेह (रक्तातील साखर) तपासणी डोळ्यांची तपासणी,दात व तोंडाचे आरोग्य तपासणी
इतर आवश्यक प्राथमिक तपासण्या
शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत समुपदेशन व मार्गदर्शन देखील देण्यात आले. एकूण २४३ कर्मचाऱ्यांनी या तपासणीमध्ये सहभाग नोंदवला. त्यामध्ये १६६ पुरुष व ६६ महिला सहभागी झाल्या. तपासणीदरम्यान खालील निष्कर्ष आढळले:३५ कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब (HTN,२३ कर्मचाऱ्यांना मधुमेह (DM) १२ उच्च रक्तदाब व ८ मधुमेह रुग्णांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आल
१८० रक्त चाचण्या पूर्ण३३ कर्मचाऱ्यांनी नेत्रदानासाठी प्रतिज्ञा फॉर्म सादर करून सामाजिक जाणिवेत सहभाग घेतला १०० जणांची दंत तपासणी (३० महिला व ७० पुरुष); यामध्ये २ जणांमध्ये कर्करोगापूर्व स्थिती निदान झाल्याने पुढील तपासणीचा सल्ला देण्यात आला या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची सद्यस्थिती समजण्यास मदत झाली असून संभाव्य आजारांचे वेळेत निदान होऊन त्यावर तात्काळ उपचार सुरू करण्याची संधी मिळाली.
या शिबिरात उपस्थित राहून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी सर्व कर्मचाऱ्यांना निरोगी राहण्यासाठी सकाळच्या योग सत्रात भाग घेण्याचे आवाहन केल
या शिबिराचे नियोजन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे यांनी केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाची सोय करण्यात आली होती. डॉ. सरोज कुथे पाटील, डॉ. प्रेरणा राऊत यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफ, तालुकास्तरीय आरोग्य कर्मचारी व महा लॅब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.