vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तकोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तकोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

नवी मुंबई, प्रतिनिधी -: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ” विभागीय महसूल कार्यालयाच्या बैठक सभागृहात सकाळी 11.00 वाजता तहसीलदार (सामान्य प्रशासन ) नरेश जगताप यांच्या उपस्थितीत अधिकारी/कर्मचारी यांनी घेतली.

दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशात “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी त्यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस भव्य स्वरुपात साजरा केला जाणार आहे. म्हणून दि. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत “भारत पर्व” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

“मी राष्ट्राचे एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन, सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व कार्यामुळे देशाची एकता राखणे शक्य झाले. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे.” अशी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी/कर्मचारी यांनी शपथ घेतली. यावेळी कोकण भवनातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000 0

संबंधित पोस्ट

मतदार यादीत नाव कायम राहण्यासाठी एसआयआर कार्यक्रमांतर्गत मॅपींग करून घेणे अनिवार्य**मतदार याद्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन*

अभिलेख वर्गीकरण करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा परिषद; शनिवार, रविवारी सुरू राहणार कामकाज

नागरी सेवा देतांना येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करा – अश्विन अंबेकर

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगरासह-ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू

कोपरखैरणे विभागात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नगरसेवकांसह केली पाणी नमुने तपासणी*