vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन #सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रमसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि #युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन..

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन #सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रमसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि #युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन..

आरोग्य प्रतिनिधी-राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन #सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांमधील #असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि #युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सांगितले.

सृदृढ बालके आपल्या देशाचे भविष्य असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, हे उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणे आहे. मुलांमधील असंसर्गजन्य आजार याविषयी अधिक व्यापक जनजागृती होण्यासाठी अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाईल असेही त्यांनी सांगितले. राज्याचा आरोग्य विभाग व युनिसेफ यांच्यामार्फत आरोग्यदायी बालपण ही संकल्पना राबविण्यात येणार असून यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग व पुढाकार महत्वाचा असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अधोरेखित केले.

मुलांमधील असंसर्गजन्य आजार एक वाढती समस्या या विषयावरील या कार्यशाळेस युनिसेफचे संजय सिंह, आरोग्य सेवा संचालक, डॉ. विजय कंदेवाड (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, ‘युनिसेफ’चे डॉ. मंगेश गाधारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर येथे ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाची मान्यता.ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणारआरोग्यसेवेचा आणि त्या अनुषंगाने स्थानिक रोजगार संधीचा विस्तार…सभापती प्रा राम शिंदे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी…

vishwatmaklokswamivarta

कारागृहात कुष्ठरोग तपासणी कार्यक्रम संपन्न -कारागृहातील 179 बंदीवानांची केली कुष्ठरोग तपासणी

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून सर्व नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त कार्यक्रम आरोग्य शिबिरात २५० डॉक्टरांच्या पथकाद्वारे भाविकांची मोफत तपासणी व उपचार; पहिल्याच दिवशी सुमारे साडेपाच हजार जणांनी घेतला लाभ

vishwatmaklokswamivarta

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात प्रभावी लढाठाणे जिल्ह्यात १४–१५ वयोगटातील सर्व मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण राबविणार

vishwatmaklokswamivarta

कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणारी पहिली महानगरपालिका असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta