vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हॅलो, मी शरद पवार बोलतोय! बदलीसाठी अज्ञात व्यक्तीचा थेट मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना फोन.

हॅलो, मी शरद पवार बोलतोय! बदलीसाठी अज्ञात व्यक्तीचा थेट मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना फोन.

प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढत बदलीसाठी एका व्यक्तीने थेट मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना फोन केला. या फोनमुळे एकच खळबळ उडाली असून अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरु आहेत. या बदल्यांच्या काळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढत एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना फोन केला. ‘मी शरद पवार बोलत असल्याचं सांगून या व्यक्तीने अमुक एका अधिकाऱ्याची अमुक ठिकाणी बदली करावी असं सांगितलं’.

संशय आल्याने आशिष कुमार सिंह यांनी फेरतपास केला असता शरद पवार यांच्याकडून असा कोणताही फोन आला नसल्याची त्यांना माहिती मिळाली. हा फेक फोन असल्याचं समोर आल्यानंतर आशिष कुमार सिंह यांनी गावदेवी पोलीस स्थानकात  तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून पोलीस या अनोळखी व्यक्तीचा शोध घेत आहेत.

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी..

vishwatmaklokswamivarta

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी…

vishwatmaklokswamivarta

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना निर्धार*

vishwatmaklokswamivarta

दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांन शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

निर्धाराला सलाम : ‘अशा हल्ल्यांना घाबरणार नाही, काहीही झालं तरी कर्तव्य बजावत राहणार’

मुंबईतील: पवई, हिरानंदानी मध्ये मॉल मध्ये लागली आग; 12 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना

vishwatmaklokswamivarta