vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

डेल्टा प्लसचा कहर! रायगडमध्ये 2 रूग्णांचा मृत्यू

डेल्टा प्लसचा कहर! रायगडमध्ये 2 रूग्णांचा मृत्यू

प्रतिनिधी : राज्यात डेल्टा प्लसने कहरच केला आहे. डेल्टा प्लसच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसतेय. त्यातच आता राज्यात मृत्यूचा आकडा थेट 4 वर जाऊन पोहोचलाय. रायगड जिल्ह्यात डेल्टा प्लसमुळे दोन जणांना मृत्यू झाला आहे. यामुळे आता राज्यात अजूनच चिंता वाढली आहे.

नुकतंच मुंबईत एका 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाल्याची माहिती होती. त्यातच आता रायगडमधील नागोठणे आणि उरणमध्ये 1-1 रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात डेल्टा प्लसमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 4 वर गेली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईत बुधवारी एकाच दिवशी डेल्टा प्लस बाधित ७ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आणखीन वाढली आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेने करोनावरील लसचे दोन्ही डोस घेतले होते.

अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, मुंबईत मृत्य़ू झालेल्या या महिलेला कोरडा खोकला तसंच अंगदुखीचा त्रास होत होता. शिवाय चवंही लागत नव्हती. त्यानंतर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात महिलेवर उपचार सुरू होते. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्यानंतर रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स त्यांना देण्यात येत होतं.

मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून डेल्टा प्लस विषाणूची लागण होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे जीनोम सीक्वेन्सिंगमध्ये स्पष्ट झालं आहे. डेल्टा प्लसचा हा राज्यातील दुसरा मृत्यू ठरला आहे. जूनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये डेल्टा प्लसने महिलेचा मृत्यू झाला होता.

राज्यात सध्या 65 डेल्टा प्लसचे रुग्ण होते. राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 20 नवे रुग्ण बुधवारी आढळले. त्यामुळे डेल्टा प्लस बाधित एकूण रुग्णांची संख्या 65 वर पोहचली.

राज्यात डेल्टा प्लसचे आता एकूण 65 रुग्ण आहेत. बुधवारी एकाच दिवशी डेल्टा प्लसचे 20 नवे रुग्ण आढळले. नव्याने आढळलेल्या 20 रुग्णांपैकी मुंबईत ७, पुण्यात ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर इथे प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला इथे प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलंय.

संबंधित पोस्ट

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल   – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

आज सोमवार: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल? 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती· 2024-25 मध्ये देशाच्या 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात· गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक….

पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी;सर्व विभागांनी योग्य समन्वयाने, काम करा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात;नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

आदिशक्‍तीच्या आगमनाचे वेध सार्वजनिक मंडळांनीही नवरात्रोत्‍सव  साजरा करण्याची तयारी सुरू  

vishwatmaklokswamivarta

संत संताजी जगनाडे महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

vishwatmaklokswamivarta