vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज सोमवार: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल? 

आज सोमवार : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल?

नवी दिल्ली प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र सोमवारी सकाळी क्रूडच्या दरात किंचित वाढ झाली. क्रूड सध्या 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. क्रूडच्या दरात (crude prices) घसरण होऊनही देशांतर्गत बाजारात तेलाच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel ) दर जुन्याच पातळीवर कायम आहेत.

 

22 मे रोजी शेवटचे बदलले

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे 2022 रोजी झाला होता. त्यावेळी सरकारच्या वतीने उत्पादन शुल्कात कपात करून जनतेला मोठा दिलासा देण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण देशात एकाच वेळी किमतीत बदल झाला होता. यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये तेलाच्या किमती बदलल्या. 1 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात कपात केली.

कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि एलपीजीमधील (LPG) तोटा भरून काढण्याच्या स्थितीत पोहोचल्या आहेत. सोमवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $85.82 वर पोहोचली. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 92.15 वर दिसले. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर राज्यात पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांची कपात करण्यात आली.

 

 तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल आजचे दर- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

– पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती  एसएमएसद्वारे (SMS) देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर SMS करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज शौर्य आणि आदर्शाचे प्रतिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर १० नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

रेल्वे जागेवरील झोपडपट्ट्याच्या पुनर्वसनसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार- मंत्री उदय सामंत

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

लोणीत रंगणार जलसंपदा विभागाचा ‘क्रीडाकुंभ’ राज्यभरातील अधिकारी – कर्मचारी दाखवणार खेळाचे कौशल्य७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लोणी – शिर्डीत क्रीडा स्पर्धांचा थरार ; तयारी अंतिम टप्प्यात…

vishwatmaklokswamivarta