vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी; 608 पैकी 51 आगोदरच बिनविरोध

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी; 608 पैकी 51 आगोदरच बिनविरोध…

राज्य प्रतिनिधी

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (19 सप्टेंबर) पार पडत आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पद निवडीसाठीही मतदान झाले. त्यापैकी 547 ग्रामपंचायतीचा आज निकाल आहे.

 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (19 सप्टेंबर) पार पडत आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पद निवडीसाठीही मतदान झाले. त्यापैकी 547 ग्रामपंचायतीचा आज निकाल आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (19 सप्टेंबर) पार पडत आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पद निवडीसाठीही मतदान झाले. त्यापैकी 547 ग्रामपंचायतीचा आज निकाल आहे. त्यातही जवळपास 51 ग्रामपंचायती आगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि सरपंच अशा दोन्हीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडते आहे. सकाळी दहा वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा कौल काय आहे हे या निकालानंतर कळण्यास मदत होणार आहे.

 

राज्यातील 16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पद निवडीसाठीही मतदान झाले. त्यातील जिल्हानिहाय तालुके आणि त्यातील ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे: नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार– 75, धुळे: शिरपूर- 33, जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02, बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02, अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01, वाशीम: कारंजा- 04, अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01 ,यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08, नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01, हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04, नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17, पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02, अहमदनगर: अकोले- 45, लातूर: अहमदपूर- 01, सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08, कोल्हापूर: कागल- 01

 

राज्यात सत्तांतर झाल्याने पुन्हा एकदा थेट जनतेतूनच सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेची पसंती आणि प्रतिसाद कसा मिळतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. अनेक ठिकाणी या आधी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य वेगळ्या गटाचे आणि सरपंच वेगळ्या गटाचा झाला आहे. त्यामुळे निर्णय घेताना अडचणी आल्याचेही पाहायला मिळाले आहे.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवनाची पाहणी-प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावी – अजित पवार

vishwatmaklokswamivarta

विभागीय क्रीडा संकुल समिती बैठक-प्रवेशासाठी डिजीटल पडताळणी पद्धतीचा अवलंब;ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचार:आज मिरझापुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची सभा*

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- खा. श्रीरंग बारणे दिशा’ समितीची बैठक संपन्न

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने तातडीने 10 कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरित करावा,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी जिल्ह्यातील : साखरपा-खडीकोळवण येथे दरड कोसळली, डोंगराला भेगा पडल्याने ग्रामस्थांत भीती.