vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

 

राज्य प्रतिनिधी -जालना, :- भारतीय कपास महामंडळ, नवी मुंबई सार्वजनिक सुचना सर्व मान्यवर कापूस उत्पादक शेतकऱ्याना कळविण्यात येते की, भारतीय कपास महामंडळाने कापूस किसान मोबाईल अँप नावाचे मोबाईल अप्लिकेशन सुरू केले आहे. जे कापूस हंगामात 24 तास व 7 दिवस उपलब्ध असेल. कापूस किसान मोबाईल अॅपद्वारे नोंदणी व स्लॉट बुकिंग प्रक्रियेस मदत करण्यासाठी एक विशेष लिंक तयार करण्यात आली आहे. ज्या अॅपमध्ये नोंदणी व स्लॉट बुकिंगसाठी सविस्तर माहिती व पायऱ्या दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना विनंती आहे की खालील लिंकवर क्लिक करून स्थानिक भाषेत तयार केलेली माहिती व व्हिडिओ पहावे. https://www.youtube.com/@KapasKisan-Official स्लॉट बुकिंग सुविधा सात दिवसाच्या रोलिंग बेसिसवर खुली राहील. प्रत्येक दिवशी एक तारीख बंद होईल व दुसऱ्या दिवशी नवीन तारीख खुली केली जाईल. उद्घाटनाच्या दिवशी सुट्टी नसेल, महाराष्ट्र राज्याकरिता स्लॉट बुकिंगची वेळ औरंगाबाद शाखा दररोज सकाळी 10 वाजता होईल. असेही विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादीत, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा

राज्यातील काही जिल्हयांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या महत्वाच्या ठिकाणी एनडीआरएफच्या सतरा आणि एसडीआरएफच्या सहा पथकं सज्ज..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिलारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना आज ६ जुलै रोजी सुटी जाहीर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta