vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी

नाशिक, प्रतिनिधी : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महाजन यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणारा विकास कामांमध्ये रस्त्यांची कामे महत्त्वाची आहेत. त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊन मार्ग काढण्यात येईल

नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सर्वानुमते सहमतीने निर्णय घेण्यात येईल, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागरिकांचा संवाद साधून दिला.

यावेळी रस्त्याच्या रुंदीकरणाशी मोजणी व बाधित होणाऱ्या क्षेत्र याबाबत मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली.

०००

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन*

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ साजरा,अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा – राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta

संसर्गजन्य आजारांबाबत खबरदारी बाळगा- जिल्हाधिकारी स्वामी

पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही!*शासनाने ‘सावरकर सदना’चे संपादन करून ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे* – हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी!

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक-उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा – खर्च निरीक्षक व्ही. कुमार