vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे

शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे

        सांगली, प्रतिनिधी : शेतकऱ्यांना हमखास व स्थिर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध व्हावी, स्थानिक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभ घेता यावा, तसेच जिल्ह्यातील कृषी उद्योगास व निर्यातीस चालना मिळण्यासाठी सांगली येथे शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उत्पादक खरेदीदार (बायर-सेलर मीट) संमेलन घेण्यात येणार आहे. हे संमेलन दीपायन बँक्वेट हॉल, जुने आरटीओ ऑफिस समोर, माधवनगर रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

       जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, या उत्पादक खरेदीदार संमेलनामध्ये 100 पेक्षा जास्त खरेदीदार सहभाग घेणार आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला या माध्यमातून नवीन बाजारपेठ निर्माण होणार आहे. या संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

    जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील काही भाग पूर्वी दुष्काळी होता. परंतु, आता ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या उपसा जलसिंचन योजनांमुळे पूर्णपणे बागायत झालेला आहे. शेतक‌ऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून आता सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, केळी या फळपिकांचे उत्पादन करण्यात येते व देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात येते. विशेषतः द्राक्ष व बेदाणा निर्यातीसाठी सांगली जिल्ह्याची विशेष ओळख आहे. या फळपिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे या नवीन बाजारपेठांची ओळख शेतकऱ्यांना होण्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

00000

संबंधित पोस्ट

प्रशासन हे सुशासन करण्यात ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

भगवानगड विकासासाठी वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

लस निर्मितीसाठी हाफकिनला २५ कोटी- उपमुख्यमंत्री अजित पवार हापकिन सक्षमीकरणासाठी शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी त्रिसदस्य समिती..

उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आठ हजार कोटींचा सामंजस्य करार…

vishwatmaklokswamivarta

सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील- मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta