vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी आरक्षण जाहीर*

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी आरक्षण जाहीर*

राज्य प्रतिनिधी- पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडतीचे आयोजन करण्यात आले. या सोडतीमध्ये वीस प्रभागातील अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

यावेळी अतिरीक्त आयुक्त(1) गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त (2) महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, सचिव अक्षय कदम,उपायुक्त वैभव विधाते, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, आरेखक नितीन हुद्दार, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 प्रारूप आरक्षणावरती हरकती व सूचना मागविण्यासाठी विहीत नमुन्यात 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रसिध्द करण्यात येणार आहेत. तर प्रारूप आरक्षणावरती हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर2025 असणार आहे. तसेच 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण विहीत नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक नाट्यगृहात उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार-प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

vishwatmaklokswamivarta

मतदारयादी मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठीपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यातील खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी;४२ आधुनिक कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण; निवास व भोजनाचीही मोफत सुविधा

vishwatmaklokswamivarta

मार्डी येथे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मुक्कामी दौरा महिलांच्या हॉलचा प्रश्न जागेवरच निकालीअवैध दारू विक्रीवर कडक कारवाईचे निर्देश

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने-महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख,नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

vishwatmaklokswamivarta