vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम; कुष्ठरोगमुक्त बुलढाण्यासाठी सहकार्य करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम; कुष्ठरोगमुक्त बुलढाण्यासाठी सहकार्य करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यात एलसीडीसी कुष्ठरोग शोध मोहीम दि. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी स्वेच्छेने तपासणी करून घ्यावी आणि कुष्ठरोग मुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

कुष्ठरोग शोध मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. हरी पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. के. व्ही. राठोड, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, बाह्यरुग्ण विभाग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी आणि इतर समिती सदस्य उपस्थित होते

मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 1836 पथकांमार्फत एकूण 23 लक्ष 75 हजार 256 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, घराघरात येणाऱ्या आरोग्य पथकांमार्फत कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बैठकीत आरोग्य शिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमांद्वारे बुलढाणा जिल्हा कुष्ठमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच, शासनाच्या गॅझेटनुसार कुष्ठरोग हा “नोटीफायबल” आजार घोषित असल्याने सर्व कुष्ठ रुग्णांची नोंद शासकीय दवाखान्यात करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सात दिवसांच्या आत संबंधित रुग्णांची नोंद नजीकच्या सरकारी दवाखान्यात करावी, असा सूचना देण्यात आल्या.

000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा 1 मार्च रोजी शुभारंभ

🦟🚨 राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती मोहिम📉 डेंग्यू रुग्णसंख्येत घट; नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात – डॉ. सुजिता वाडीवे

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠112 पिशव्या रक्त संकलित- दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन

vishwatmaklokswamivarta

मोफत वैद्यकीय उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी,आयुष्मान कार्ड आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी ‘वॉर रूम’ची स्थापना.

vishwatmaklokswamivarta

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानांतर्गतजिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते गरजूंना चष्मे वाटप- अभियानात 11 हजार रूग्णांची नेत्र तपासणी- 1205 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया