vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

राज्य प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-04 यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे आयोजन करण्यात आले असून ही परीक्षा रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे नियोजित आहे.

टेट परीक्षेच्या कार्यवाहीबाबतची सर्व अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येत आहे. मात्र, अलीकडे युट्युब चॅनेल्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि प्रसार माध्यमांद्वारे परीक्षेसंबंधी अनेक दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, उमेदवारांनी अशा कोणत्याही अनधिकृत माहितीवर किंवा अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नये.

उमेदवार आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधीच्या सर्व सूचना आणि माहितीसाठी केवळ www.mscepune.in तसेच http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळांचेच वेळोवेळी अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांचे किंवा उमेदवारांचे नुकसान झाल्यास, त्याला ते स्वतः जबाबदार असतील, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 16 जूनपासून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम

पानेवाडीत रंगला कुस्तीचा महासंग्राम! विजेत्यांना घाटगे पाटलांच्या मानाची बक्षिसे -पानेवाडीत कुस्तीचा महासंग्राम! विजेत्यांचा सत्कार!

*उपहारगृह सुरू करण्यासाठी निवीदा सादर करण्यास मुदतवाढ*

vishwatmaklokswamivarta

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले समाधी स्थळी अभिवादन* 

लिंकिंग केल्यास कठोर कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड खरीप हंगामासाठी बियाणे व खतांचा वेळेत व सुरळीत पुरवठा करण्याचे आदेश

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य· मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील· अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास मान्यता

vishwatmaklokswamivarta