vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात 16 जूनपासून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम

जिल्ह्यात 16 जूनपासून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम

 

सांगली, प्रतिनिधी: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात उन्हाळ्याची सुट्टी संपून दि. १६ जून २०२५ रोजी शाळा सुरू होत आहेत. यासाठी दि. १६ ते ३० जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रभावीपणे साजरा होत आहे. ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना (दिव्यांग मुलांसह) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

शासन निर्णय दिनांक १२ मार्च २०२५ अन्वये नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात “१०० शाळांना भेटी देणे” हा उपक्रम राबविण्यात येत असून, यामध्ये लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साह, चैतन्य व आनंदमयी होईल अशा पध्दतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली आहे.

 जिल्ह्यातील सर्व शाळा दि. १६ जून २०२५ रोजी सुरू होणार असून दाखलपात्र मुलांची यादी तयार करून शाळा फलकावर, ग्रामपंचायत येथे दर्शनी भागात तसेच गावातील प्रमुख चौकातील फलकावर ही यादी लावून मुलांना शाळेत दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष गरजा असणाऱ्या प्रत्येक बालकास शाळेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शाळा प्रारंभ दिनापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

 शाळा सुरु होण्यापूर्वी तीन दिवस अगोदर गावात दवंडी देण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर स्थानिक पातळीवर शिक्षकांमार्फत गृहभेटी देण्यात येतील. शालेय परिसर स्वच्छता करून सडा -रांगोळी काढण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व परिसराची सजावट करून तोरण बांधून गावातील लोकप्रतिनिधी, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, स्थानिक शासकीय अधिकारी यांच्या सहभागाने पारंपरिक वेशभूषेत, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना सवाद्य मिरवणुकीने शाळेत आणण्यात येणार आहे. बालकांना गोड खाऊ वाटप करण्यात येणार आहे. जेणेकरून नवागतांचा उत्साह वाढेल व त्यांच्यामध्ये शाळेबद्दल ओढ निर्माण होईल.

 शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे. तसेच, शाळेच्या प्रथम दिवशी मध्यान्ह भोजनात गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील अधिकारी यांना प्रत्येकी दोन शाळा दत्तक शाळा म्हणून देण्यात आलेल्या आहेत. सदर शाळांना वर्षभरात वेळोवेळी भेटी देवून विद्यार्थी गुणवत्ता व शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावा घेवून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व तालुक्याकडून दररोज शाळेत दाखल होणाऱ्या मुलांची माहिती जिल्हास्तरावर संकलित केली जाणार आहे. 100 टक्के पटनोंदणी करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सरकारची मराठा-ओबीसी ऐक्याला धक्का देणारी भूमिका — डॉ. संजय लाखे पाटील; उपसमितीला पडताळणीचा अधिकार नाही

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे.

सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरी महोत्सवासारखे महोत्सव ही काळाची गरज- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टोयोटा कंपनीचे उच्च अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट,शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा निर्मिती साठी एकत्र काम करणार..    -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधीn- सरन्यायाधीश भूषण गवई मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव.

रुग्णालयांना पॅनलवर समावेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहनआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार