vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा युवा महोत्सव उत्साहात संपन्न 

जिल्हा युवा महोत्सव उत्साहात संपन्न

रायगड-अलिबाग , प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या वतीने आयोजित जिल्हा युवा महोत्सवाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा महोत्सव जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग येथे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा युवा अधिकारी – मेरा युवा भारत, अमित पुंडे, परीक्षक प्राजक्ता कोकणे, डॉ. अॅड. निहा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांनी महोत्सवाच्या माध्यमातून युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. परीक्षकांनीही युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी तर आभार प्रदर्शन सुचिता दमाले यांनी केले. सूत्रसंचालन किरण करंदीकर यांनी केले.

जिल्ह्यातील मोठ्या संख्येने युवक-युवतींनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यातील विशेष निकाल पुढीलप्रमाणे—

लोकगीत व लोकनृत्य

सीकेटी कॉलेज, पनवेल

लोकगीत प्रकार: पारंपरिक कोळीगीत सादर करून प्रथम क्रमांक

लोकनृत्य प्रकार: छत्तीसगढचे आदिवासी नृत्य सादर करून प्रथम क्रमांक

प्रिझम संस्था, अलिबाग – द्वितीय क्रमांक

विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्प सादरीकरणप्रथम: मनस्व मधुकर थळे – पी.एन.पी. होली चाइल्ड CBSE स्कूल, अलिबाग

द्वितीय: सर्वेश शैशव सताळकरतृतीय: स्निग्धा प्रसाद पाटील

कथालेख

प्रथम: आयेशा खलपे – पी.एन.पी. होली 40 CBSE स्कूल

द्वितीय: प्रणत शेडगे – सीकेटी कॉलेज पनवेल

तृतीय: विवेक दास – पी.एन.पी. होली 40 CBSE स्कूल

चित्रकला स्पर्धा,प्रथम: सानिया नितीन म्हात्रे – पी.एन.पी. ज्युनियर कॉलेजद्वितीय: कशिश गणेश तिखे – सीकेटी कॉलेज पनवेल

वक्तृत्व स्पर्धा,प्रथम: संयोगी राजेंद्र नाईक – जे.एस.एम. कॉलेज अलिबागद्वितीय: वेदांत दिलीप कंटक – डॉक्टर C.D. देशमुख कॉलेज, रोहा

कविता लेखन-प्रथम: अनुष्का कोकणे – सीकेटी कॉलेज पनवेलद्वितीय: प्रणव शेडगे – सीकेटी कॉलेज पनवेलतृतीय: समृद्धी म्हात्रे – PNP SCS कॉलेजएकूण 33 विजेते युवक-युवती विभागीय स्पर्धेसाठी निवडण्यात आले.

०००

संबंधित पोस्ट

कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके वतक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335

मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचेशासकीय सेवेत घवघवीत यश..

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृह परिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध …

vishwatmaklokswamivarta

मुंबई येथे 30 जून रोजी डाक अदालत

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण..

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प- व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड