vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ‘युनिटी पदयात्रा’ उत्साहात संपन्न

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ‘युनिटी पदयात्रा’ उत्साहात संपन्न

 

     अमरावती, प्रतिनिधी: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 2025 हे वर्ष 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. ‘मेरा युवा भारत’ (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत या सोहळ्याचे औचित्य साधून, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त (31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 ‘सरदार@ 150 अभियान’) देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज जिल्हास्तरीय ‘युनिटी पदयात्रा’चे आयोजन मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथे करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, , महानगरपालिका अमरावतीचे उपआयुक्त नरेंद्र वानखेडे, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

  कार्यक्रमाच्या प्रारंभी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी, राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारी पथनाट्ये आणि सांस्कृतिक नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली, तसेच उपस्थितांनी आत्मनिर्भर भारताची शपथ घेतली. त्यानंतर, मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथून सुरू झालेली ही ‘सरदार@ 150’ पदयात्रा इर्विन चौक मार्गे मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहातून परत महाविद्यालयाकडे मार्गस्थ झाली.

  मेरा युवा भारत अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, तसेच एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक, होमगार्ड, भारत स्काऊट गाईड आणि विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकवृंद, हजारो विद्यार्थी व स्वयंसेवक या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राष्ट्रीय एकात्मता आणि ‘एक भारत, आत्मनिर्भर भारत’ चा संदेश देणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

 

000000

संबंधित पोस्ट

जाफराबाद आगारातून १३ नव्या एस.टी. बस सेवा सुरु- आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते लोकार्पण

जालन्याची चिमुकली सिया दांदडे**ठरली जागतिक कीर्तीची क्रिएटर!* =इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाची नोंद…

vishwatmaklokswamivarta

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन**महाबळेश्वर येथे आयोजित महापर्यटन उत्सव-२०२५ चा शानदार समारोप*

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिका आणि भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत संपन्न,सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षांसाठी बसणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष शिथिलता देण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी व १२वी च्या परीक्षा २४ जून ते १६ जुलै होणार. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी