vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बीएसयूपी सदनिकांमध्ये घर घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटुंबांना होणार लाभ

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बीएसयूपी सदनिकांमध्ये घर घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटुंबांना होणार लाभ…

मुंबई, प्रतिनिधी : ठाणे महापालिका हद्दीतील जे.एन.एन.यु. आर.एम. आणि बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत प्रकल्पबाधितांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देतानाच त्यासाठी प्रतिदस्त १०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

केंद्र शासन, राज्य शासन व ठाणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या जे.एन.एन.यु.आर.एम., बी.एस.यू.पी. योजना शहरी गरिबांकरिता आहेत. ठाणे महानगरपालिकेमार्फत या दोन्ही योजनेतंर्गत विकसित करण्यात आलेले भूखंड सध्याच्या झोपडपट्टयांच्या जागी असून तेथील नागरिकांचे पुर्नवसन बी.एस.यू.पी. सदनिकांमध्ये केले जाते.

हे रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरीची कामे करतात. त्यामुळे त्यांना सदनिका घेताना करारनामा दस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार न सोसणारा आहे. तसेच यातील काही कुटुंबांना मिळणाऱ्या सदनिकांकरिता प्रत्येकी ५६ हजार ते १ लाख ३४ हजार इतका अधिभार भरावा लागणार होता. ही बाब विचारात घेऊन या योजनेंतर्गतच्या शहरी गरीबांकरिता एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटूंबांना होणार आहे

संबंधित पोस्ट

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान-माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम

vishwatmaklokswamivarta

लेख : गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?- सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध मागण्यांवर शासनाची सकारात्मक कार्यवाही

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा.- माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकार संपूर्ण अरवली पर्वतरांगेचे रक्षण करेल; खाण भाडेपट्टीने दिली जाणार नाहीत; संरक्षित क्षेत्राचा विस्तार केला जाणार

vishwatmaklokswamivarta