vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

डोंगराळे अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

डोंगराळे अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, प्रतिनिधी : डोंगराळे (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येची घटना अत्यंत गंभीर, संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबाची झालेली मानसिक, सामाजिक व भावनिक हानी अपरिमित असून, शासनामार्फत पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून १० लाख रुपयांची तत्काळ मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

संबंधित घटनेची माहिती मिळताच प्रशासनाला कुटुंबाच्या मदतीसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री तटकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला होता. जिल्हा महिला व बालविकास समितीने मनोधैर्य योजनेअंतर्गत १० लाख रुपये इतकी आर्थिक मदत पिडीत बालिकेच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला.

मंजूर मदत ही केवळ तत्काळ दिलासा देणारी असून वास्तविक झालेली हानी कोणत्याही आर्थिक सहाय्याने भरून न येणारी आहे. तथापि, या कठीण प्रसंगी शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे, असे मंत्री तटकरे यांनी नमूद केले.

यापुढील काळात या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेत आवश्यक समन्वय, कायदेविषयक मार्गदर्शन, पुनर्वसनासंदर्भातील सहाय्य, तसेच पीडित कुटुंबाच्या रक्षण आणि हिताविषयीच्या सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महिला व बालविकास विभाग पूर्णतः कटिबद्ध असून, संबंधित यंत्रणांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

0000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध, प्रगतिशील होवो; उपमुख्यमंत्र्यांचे विघ्नहर्ता गणरायाचरणी साकडे

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांच्या पूर्वतयारीबाबत महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा…

vishwatmaklokswamivarta

आमदार धिरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 10 लक्ष रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटपजिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करु : आ. धिरज लिंगाडे

पुराचा वेढा भेदून ‘आपदा मित्र’ ठरले देवदूत; सिरोंचात सर्पदंश झालेल्या व्यक्तीला जीवदान

vishwatmaklokswamivarta

महारेशीम अभियान २०२५;वर्षभरात २.२५ मे.टन धागा निर्मिती-जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

vishwatmaklokswamivarta