vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

मुंबई, प्रतिनिधी : संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील,महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे उपस्थित होते.

भारतीय संविधानाच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत ‘घर घर संविधान’ या उपक्रमांतर्गत संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्य असलेल्या बी.आय.टी. चाळ येथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमाने संविधान दिनाचा आरंभ झाला.

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आधारित चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून मुंबई शहर व उपनगरातील समाजभूषण पुरस्कारप्राप्त नामवंतांना संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सिद्धिविनायक मंदिर, दादर ते चैत्यभूमी या दरम्यान संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.

 

0000

संबंधित पोस्ट

विभागाने द्वारपोच चिकित्सा सेवा द्यावी-मंत्री पंकजा मुंडे *गोशाळा नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप

ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर शासनाचा भर – इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे • रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा• नांदेडमध्ये ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात ..

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांचे दानवाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी‘बुक बॅंक’ उपक्रम- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत

ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आवारातील“टेरेस गार्डन”च्या निर्मिती उपक्रमाचे उद्घाटन संपन्न

राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ ही संकल्पना

vishwatmaklokswamivarta