vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

अमेरिका:अफगाणिस्तान प्रमाणेच 19 वर्षांपुर्वी व्हिएतनाममधून काढला होता पळ, सोमालिया आणि क्युबामध्ये फिरवली होती पाठ

अमेरिका:अफगाणिस्तान प्रमाणेच अमेरिकेने 19 वर्षांपुर्वी व्हिएतनाममधून काढला होता पळ, जाणून घ्या महासत्तेने सोमालिया आणि क्युबामध्ये कशी फिरवली होती पाठ

जाणून घ्या चार घटनांविषयी…

“तुम्ही एकतर आमच्या बरोबर आहात किंवा आमच्या विरोधात …” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 21 सप्टेंबर 2001 रोजी 9/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर हे वक्तव्य केले आणि त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी अमेरिकन विमानांनी अफगाणिस्तानवर बॉम्बचा वर्षाव करण्यास सुरुवात सुरुवात केली. आज जवळजवळ 20 वर्षांनंतर याच अमेरिकेने अफगाणिस्तानातून पळ काढला आहे. काबूलसह जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या ताब्यात गेला आहे, ज्यांच्याविरोधात या महासत्तेने War on terror म्हणजेच दहशतवादाविरोधी युद्ध पुकारले होते.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे सामान्य अफगाणी इतका अस्वस्थ आहे की, काबूलवर तालिबानच्या ताब्यानंतर 3 हजारांपेक्षा जास्त लोक रात्रीच विमानतळात घुसले. लोक टेकऑफ करणाऱ्या विमानांमागे आणि पुढे धावू लागले. जणू एखाद्या बसमध्ये गर्दी होते तसे चित्र येथे दिसले. यावेळी तीन अफगाणी लोक विमानाच्या चाकांमध्ये लपून बसले होते. टेकऑफनंतर ते थेट जमिनीवर कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

विशेष गोष्ट अशी की, अमेरिकेने एखाद्या देशाला दगा दिल्याची ही पहिलीच वेळ नाहीये. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने किमान चार देशातून अशीच माघार घेतली होती.

अमेरिकेने अफगाणिस्तानपूर्वी व्हिएतनाम, क्यूबा आणि सोमालिया मधून कसा पळ काढला होता, त्याविषयी जाणून घेऊया…

1. व्हिएतनाम: सलग 19 वर्षे लढा देऊन अमेरिका देश सोडून निघून गेला

29 एप्रिल 1975 : 19 वर्षे भयानक बॉम्बस्फोट आणि आधुनिक शस्त्रे असूनही उत्तर व्हिएतनामच्या कम्युनिस्ट सैन्याबरोबरच्या युद्धात 58 हजार अमेरिकन सैनिक मारले गेले. युद्धाविरोधात अमेरिकेत निदर्शने सुरू झाली. अशा परिस्थितीत पॅरिस शांतता कराराच्या नावाखाली 1973 मध्ये अमेरिकन सैन्याने व्हिएतनाम सोडले. दोन वर्षांतच कम्युनिस्ट सैन्याने अमेरिका समर्थित दक्षिण व्हिएतनामची राजधानी सायगॉनमध्ये प्रवेश केला. तेथे अडकलेल्या अमेरिकन लोकांना वाचवण्यासाठी अमेरिकन दूतावासाजवळील एका इमारतीच्या छतावर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. पळून जाणाऱ्या अमेरिकन

29 एप्रिल 1975 : 19 वर्षे भयानक बॉम्बस्फोट आणि आधुनिक शस्त्रे असूनही उत्तर व्हिएतनामच्या कम्युनिस्ट सैन्याबरोबरच्या युद्धात 58 हजार अमेरिकन सैनिक मारले गेले. युद्धाविरोधात अमेरिकेत निदर्शने सुरू झाली. अशा परिस्थितीत पॅरिस शांतता कराराच्या नावाखाली 1973 मध्ये अमेरिकन सैन्याने व्हिएतनाम सोडले. दोन वर्षांतच कम्युनिस्ट सैन्याने अमेरिका समर्थित दक्षिण व्हिएतनामची राजधानी सायगॉनमध्ये प्रवेश केला. तेथे अडकलेल्या अमेरिकन लोकांना वाचवण्यासाठी अमेरिकन दूतावासाजवळील एका इमारतीच्या छतावर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते.

अमेरिकेने माघार घेतल्याची सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे व्हिएतनामचा किस्सा. अफगाणिस्तानातील सैन्याच्या संख्येच्या पाच पट आणि 19 वर्षांच्या भीषण बॉम्बस्फोटानंतरही अमेरिका कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनामला आपल्यासमोर झुकवू शकला नाही.

घरगुती दबावाखाली 1969 मध्ये राष्ट्राध्यक्ष बनलेले रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाममधून बाहेर पडण्याचा विचार केला. जानेवारी 1973 मध्ये अमेरिका, उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम आणि व्हिएतकाँग यांच्यात पॅरिसमध्ये शांतता करार झाला.

वास्तविक, या कराराच्या आड अमेरिकेला व्हिएतनाममधून आपले सैन्य मागे घ्यायचे होते. यानंतर व्हिएतनाममध्येही तेच घडले जे आज अफगाणिस्तानमध्ये घडत आहे.

29 मार्च 1973 रोजी अमेरिकेच्या सैन्याने पूर्णपणे माघार घेण्यापूर्वी उत्तर व्हिएतनामने दक्षिण व्हिएतनामवर आक्रमण केले.

दोन वर्षांनंतर, 30 एप्रिल 1975 रोजी कम्युनिस्ट व्हिएतनामी सैन्याने सायगॉनमध्ये प्रवेश केला आणि उरलेल्या अमेरिकन लोकांना तेथून घाईघाईने पळून जावे लागले.

संबंधित पोस्ट

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना राज्य निधीच्या गैरवापराच्या आरोपाखाली अटक

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तान मध्ये  शरण या किंवा मरा; तालिबानची धमकी देणारी पत्रे शिकवली जात आहेत..

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेतील बारमध्ये जोरदार गोळीबार; 12 जण गंभीर जखमी

vishwatmaklokswamivarta

ब्रिटनमध्ये महागाईचा उच्चांक; प्राण्यांचे अन्न खात आहेत लोक, मेणबत्तीवर जेवण करत आहेत गरम

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तानातून युक्रेनच्या विमानाचे अपहरण..

म्यानमारच्या लष्कराचा बंडखोरांच्या भागात हवाई हल्ला, 100 हून अधिक ठार