
अमेरिकेतील बारमध्ये जोरदार गोळीबार; 12 जण गंभीर जखमी..
विदेश प्रतिनिधी
अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरातील केन्सिंग्टन आणि अलेघेनी भागातील एका बारमध्ये काही हल्लेखोरांनी गोळीबार केलाय. या हल्ल्यात 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, अमेरिकन पोलिसांनी अद्याप या घटनेची माहिती दिलेली नाही.
अमेरिकेत दररोज गोळीबाराच्या बातम्या समोर येत आहेत. गेल्या महिन्यात 13 ऑक्टोबरला दक्षिण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातून अशीच बातमी समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5 वाजल्यानंतर येथील एका निवासी भागात गोळीबार झाला. यामध्ये पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला होता.
त्याचवेळी फ्लोरिडातील टाम्पा इथं झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. 9 ऑक्टोबरला स्थानिक वेळेनुसार, पहाटे 3 च्या सुमारास गोळीबार झाला होता.



