
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके मताधिक्य घेताना दिसत आहे.मताधिक्यासोबत ‘नोटा’ची चर्चा
मुंबई प्रतिनिधी
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके मताधिक्य घेताना दिसत आहे.मताधिक्यासोबत ‘नोटा’ची चर्चा..
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ( Andheri Bypoll Result 2022) शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) मताधिक्य घेताना दिसत आहे. आज सकाळी आठ वाजलेपासून सुरु झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच लटके आघाडीवर आहेत. ऋतुजा लटके यांना तुल्यबळ उमेदवार पाहायला मिळत नाही. असे असल तरी ‘नोटा’ धक्कादायकरिरत्या मते मिळवताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नोटाला मिळणारी मते पाहता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना मताधिक्य परंतू, सामना ‘नोटा’शी असे चित्र निर्माण झाले आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मतमोजणीच्या सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. चारही फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके आघाडीवर तर ‘नोटा’ दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळत आहे. फेरीनिहाय निकाल खालील प्रमाणे.
मतमोजणीची सातवी फेरी (उमेदवार निहाय मतदान
ऋतुजा लटके -24955, बाळा नाडार -733,मनोज नाईक – 416, मीना खेडेकर – 646,फरहा न सय्यद – 545, मिलिंद कांबळे – 312, राजेश त्रिपाठी – 679
नोटा – 4712
एकूण मतमोजणी – 32998
मतमोजणीची सहावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके – 21090, बाळा नाडार -674, मनोज नाईक – 398, मीना खेडेकर – 587, फरहान सय्यद – 448, मिलिंद कांबळे – 291, राजेश त्रिपाठी – 621
नोटा – 4338
एकूण – 28447
मतमोजणीची पाचवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके – 17278, बाळा नडार – 570,मनोज नाईक – 365,मी ना खेडेकर – 516, फरहान सय्यद – 378, मिलिंद कांबळे – 267, राजेश त्रिपाठी – 538
नोटा – 3859
एकूण – 23771
ट्विटमतमोजणीची चौथी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके – 14648, बाळा नडार – 505, मनोज नाईक – 332, मीना खेडेकर – 437, फरहान सय्यद – 308, मिलिंद कांबळे – 246, राजेश त्रिपाठी – 492
नोटा – 3580
एकूण – 20548
मतमोजणीची तिसरी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके – 11361, बाळा नडार – 432,मनोज नाईक – 207,मीना खेडेकर – 2 81, फरहान सय्यद – 232, मिलिंद कांबळे – 202, राजेश त्रिपाठी – 410
नोटा – 2967
एकूण – 16092
मतमोजणीची दुसरी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके – 7817, बाळा नडार -339,मनोज नाईक -113 ,मीना खेडेकर -1 85,फरहान सय्यद -154, मिलिंद कांबळे – 136, राजेश त्रिपाठी – 223
नोटा -1470
एकूण -10437
मतमोजणीची पहिली फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके- 4277, बाला नाडार – 222,मनोज नाईक – 56, मीना खेडेकवर- 138,फरहान सय्यद- 103, मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127
नोटा -622
एकूण मत : 5624
एखाद्या विधानसभा पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान मिळण्याची राज्यातील बहुदा ही पहिलीच घटना असावी. दरम्यान, नोटाला मिळालेल्या मतदानावरुन आता चांगलेच राजकारण रंगले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अंधेरीमध्ये नोटाला मिळालेले मतदान हे भाजपचे असल्याचा दावा केला आहे. तर नोटाला मतदान ही स्थानिकांची भावना असावी असे भाजपने म्हटले आहे.



