vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी– भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या सुचना पुस्तिकेचे व भित्तीपत्रकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते रविवारी (दि. ३०) राजभवन, मुंबई येथे करण्यात आले.

यावेळी बोलताना राज्यपालांनी डॉ आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. ज्येष्ठ आर्य समाजी नेते आत्माराम अमृतसरी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यास मदत व शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगितले.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समरसता व बंधुभाव या मूल्यांच्या प्रचार प्रसारासाठी आपण विविध तालुक्यांना भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. आजपर्यंत आपण गुजरात येथील ११ गावांना भेट दिली असून त्याठिकाणी ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, ग्रामसभा, दलित – आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजन,

शाळेत मुक्काम व दुसऱ्या दिवशी शिवारावर जाऊन लोकांना नैसर्गिक शेतीचे महत्व पटवणे हा उपक्रम सुरु केला असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात देखील हा उपक्रम सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे तसेच समितीचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

 

000

संबंधित पोस्ट

7 हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी..जोरदार पावसाची पर्वा न करता नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी

vishwatmaklokswamivarta

राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

vishwatmaklokswamivarta

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

vishwatmaklokswamivarta

सेवा स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद भाविकांनी व्यक्त केले समाधान …

vishwatmaklokswamivarta