vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर विभाग ॲक्शन मोडवर – थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावणार !मालमत्ताकराचा भरणा तात्काळ करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन ; अन्यथा होणार कारवाई!

नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर विभाग ॲक्शन मोडवर – थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावणार !मालमत्ताकराचा भरणा तात्काळ करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन ; अन्यथा होणार कारवाई!

         नवी मुंबई प्रतिनिधी   नवी मुंबई महानगरपालिका मालमत्ताकर विभागाकडून थकबाकीदारांविरुद्ध जप्तीपूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. एकूण थकबाकीदारांपैकी आतापर्यंत ६४५ नागरिकांना ७ दिवसांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. तर २१८ नागरिकांना ४८ तासांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर न भरल्यास पुढील टप्प्यात महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष जप्ती कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे.

            मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या महसूलाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत असून यातूनच नागरिकांना विविध सेवा सुविधांची पूर्तता केली जाते. त्यामुळे कर भरण्याबाबत सातत्य नसल्यास त्याचा शहरातील विकासकामांवर परिणाम होतो. त्या अनुषंगाने थकबाकीदारांना दिलेली जप्तीपूर्व नोटीस ही नागरिकांना दिलेली अंतिम सूचना आहे. जप्तीसारख्या कठोर कारवाया टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत करभरणा करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांचेमार्फत करण्यात आलेले आहे.सुलभ व सहज कर भरणा करण्यासाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध    नागरिकांना करभरणा करण्यासाठी कोणत्याही महानगरपालिका कार्यालयात जावे न लागता घरबसल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने मालमत्ताकर विभागाने सर्व डिजिटल पेमेंट पद्धती उपलब्ध करून दिल्या असून त्याचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे केला आहे. व्हॉट्सअॅप चॅटबॉट (८२९१९२०५०४), My NMMC (माझी नवी मुंबई ) अॅप, www.nmmc.gov.in ही महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट, तसेच प्रत्येक कर देयकावरील क्यूआर कोड (QR Code) स्कॅनींग त्याचप्रमाणे फोन पे, जीपे अशा विविध युपीआय माध्यमांद्वारे पेमेंट करण्याच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तरी मालमत्ताकर धारकांनी याचा लाभ घेऊन त्वरित करभरणा करावी आणि कटू कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे पुणे येथे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी1700 कोटींच्या आराखड्यास वाढीव निधी देणार   -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हा वार्षिक योजना (2026-27) राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न

vishwatmaklokswamivarta

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ !

जयपूर डायलॉग’ हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जयपूर डायलॉग डेक्कन समिट

vishwatmaklokswamivarta