vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, प्रतिनिधी: पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवन येथे झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव (नगरविकास) असीम गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, महाव्यवस्थापक श्रीमंत पाटोळे, तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे शैलेंद्र मोरे, दीपक गायकवाड, निखिल दुर्गाई, जीवन घोंगडे, आनंद घेडे, नीता अडसुळे, स्वाती गायकवाड, अर्चना केदारी, संदीप शिंदे, मिलिंद अहिरे, सुधीर कुरूमकर उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, संबंधित जागा सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात यावा. यासंदर्भातील सर्व मुद्यांची दखल घेवून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

००

संबंधित पोस्ट

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्याशिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार

vishwatmaklokswamivarta

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुर परिस्थितीबाबत ठाणे जिल्ह्यात अंमलबजावणीसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत,मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासन सतर्क

विशेष लेख :-उन्हाळ्यात जनावरांना होणारी विषबाधा आणि उपाययोजना

एमएसआरडीसी’च्या द्रुतगती महामार्गांमुळेराज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन