vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश..

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमधील पदविका (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत 1 लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत.

विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवू नये म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत, आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

प्रत्येकाच्या स्मृतीकोषात शिक्षकाचे स्थान अढळ- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नाफा २०२५ महोत्सवात यंदा भरगच्चं कार्यक्रम!-२५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी तारेतारकांच्या उपस्थितीत रंगणार भव्य ग्लॅमरस मराठी चित्रपट महोत्सव!

vishwatmaklokswamivarta

पुणे येथील‘खडकवासला जलाशय रक्षण’अभियान 23 व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी !निसर्गाचा ऱ्हास न होता त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – भीमराव अण्णा तापकीर, भाजप आमदार, खडकवासला मतदारसंघ

हॉकी शताब्दी वर्षानिमित्त ७ नोव्हेंबरला देशभरात ४०० सामने आयोजित

vishwatmaklokswamivarta

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट—-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती